दुचाकी पिकअपचा अपघात; मुलगा जागीच ठार, आई गंभीर

चंद्रपूर: गोवरी पिकअप व दुचाकीची सामोरासमोर धडक बसल्याची घटना चुनाळा गावाजवळील रेल्वे गेटजवळ रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू तर आई जखमी झाली आहे. योगेश परशुराम आत्राम (२२) रा. विहिरगाव ता.राजुरा असे मृत मुलाचे नाव आहे, तर त्याची आई मिराबाई परशुराम आत्राम ही जखमी आहे.

योगेश व त्याची आई मिराबाईआत्राम हे काही कामानिमित्त विहिरगाव येथून राजुरा येथे जात होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची दुचाकीला समोरासमोर जबर धडक बसली. या धडकेत योगेशचा जागीच ठार झाला, तर त्याची आई मिराबाई या अपघातात जखमी झाल्या. अपघातानंतर त्यांना तातडीने राजुरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात योगेशचा मृत्यू झाल्याने विहिरगाव येथे शोककळा पसरली आहे.


दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

विसापूर तीन युवक दुचाकीने  बल्लारपूरकडून चंद्रपूरकडे जाताना दुचाकी अनियंत्रित झाली अन् दुभाजकाला धडकली. यात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर चंद्रपूर मार्गावर घडली. नसीम खान (३२) रा.

अष्टभुजा वार्ड चंद्रपूर असे मृत तरुणाचे तर विनोद मेश्राम (२८) अनिकेत सोनवणे (२२) दोघेही राहणार अष्टभुजा वार्ड असे जखमीचे नाव आहे. जखमीवर बल्लारपुरात प्रथमोपचार करून चंद्रपूर येथे हलविले आहे.