फाईल फोटो
गडचिरोली,(जिमाका)दि.23: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कोरची येथील विविध व्यवसायाची कालबाहय झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्ये/उपकरणे, आहेत. तसाच अवस्थेत करणेसाठी दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.
इच्छूक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होणेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची ,जि.गडचिरोली येथे त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित राहवे. किमान तीन खरेदीदारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही. लिलावाच्या अटी व विक्री करावयाचे साहित्ये संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.