शासकिय तथा निमशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपास तालुका काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर चा पाठिंबा..*जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.. या आपल्या न्याय मागणीसाठी राज्यभरातील शासकीय तथा निमशासकीय विभागातील कर्मचारी संपावर आहेत.. अर्जुनी/मोर तालुक्यातील सर्व शासकीय तथा निमशासकीय विभागातील कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी असून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये धरणे आंदोलन करत आहेत.. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका कमेटी चे सर्व पदाधिकारी यांनी पाठिंब्याच्या पत्र भेट देऊन सक्रिय पाठिंबा दर्शविला.. त्यावेळी मा. घनश्यामभाऊ धामट अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर, मा. श्रीकांतभाऊ घाटबांधे सदस्य जि. प. गोंदिया, कविताताई कापगते सदस्य जि. प गोंदिया, देवाजी कापगते अध्यक्ष तालुका किसान विभाग, शिलाताई उईके अध्यक्ष महिला काँग्रेस कमेटी, कृष्णाजी शहारे तथा अन्य पदाधिकारी उपस्थित होते..*