खोब्रामेंढा येथील हनुमान मंदीराची जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्धी


एजाज पठाण प्रतिनिधि 


खोब्रामेंढा येथील हनुमान मंदीराची जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्धी आहे येथे दरवर्षी रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते यावेळी येथे दर्शन व पूजा-पाठ करीता भाविकांची मोठी गर्दी उसळते उद्या रामनवमी उत्सवापासून येथील जत्रेला सूरवात होणार आहे त्यापूर्वी आज येथील देवस्थान परीसराची निरंकारी सेवादलाचा वतीने साफ सफाई व स्वच्छता करण्यात आली या उपक्रमात संत निरंकारी मंडळ शाखा मालेवाडाचे मुखी (प्रमुख) क्रीष्णाजी किंचक, विश्वनाथ गूरनूले मालेवाडाचे उपसरपंच टि एफ बोगा, शिक्षक लांजेवार, ईश्वर फरांडे, गणेश किंचक, मनोहर, निलकंठ लोहबरे, कार्तीक धकाते, देवसरा माजी सरपंच लक्ष्मन डोकरमारे तसेच सेवादलाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येत सहभागी होते