गोंगपाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत मडावी यांची नियुक्ती


 गडचिरोली गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा गडचिरोली च्या जिल्हाध्यक्ष पदी स्व. शामकांत मडावी यांचे सुपुत्र प्रशांत शामकांत मडावी ' रामनगर , गडचिरोली यांची निवड गोंडवाना गणतंत्र पार्टीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरिष उईके मुंबई यांनी नियुक्ती पत्र देवून गोंगपाचे प्रदेश महासचिव सुधाकर आत्राम यांनी पिपरटोला (नरचुली ) येथील विरांगणा राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात प्रशांत मडावी यांना पक्षाचा पिवळा दुप्पटा बांधुन नियुक्ती पत्र दिले व गोंगपाचे पुढील कार्य व्यवस्थित रित्या पार पाडून पक्ष बळकट करण्याकरीता शुभेच्छा दिल्यात प्रशांत मडावी यांनी गोगपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधाकर आत्राम व महासचिव हरिष उईके यांचे आभार मानले. 


प्रशांत मडावी हे यापूर्वी गोंगपाचे युवा अध्यक्ष म्हणुन काम करीत होते. एक धडाडीचे , तडफदार नेतृत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. मी गोंगपा पक्ष मजबुत करुन , आदिवासी बांधवाची सेवा करीन , त्याच्या समश्या शासन दरबारी माडून त्यांना न्याय मिळवून देईन असे प्रशांत मडावी यांनी ग्वाही दिली. _ प्रशांत मडावी यांच्या नियुक्ती बद्दल गोगपाचे जेष्ट नेते दिवाकर पेंदाम चंद्रपूर , प्रा. रमेश कोरचा कोरची ,चरणदास पेदांम , मालती पुडो , गडचिरोली ,साईनाथ कोडापे 'रविंद्र कोवे महाराज चामोर्शी , अतांराम पदा सर धानोरा , दिलीप सिंह पेंदाम आरमोरी , विकास कन्नाके वडसा , युवा नेता विनोद मडावी पोटेगांव , काटेंगे महाराज रांगी आदी गोंगपाच्या प्रमुख कार्यकर्त्या सहित रिपाईचे नेते प्रा. मुनिश्वर बोरकर ' शेट्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे , आदींनी अभिनंदन करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्यात.