नववीची विद्यार्थिनी गर्भवती; आरोपीला केली अटक पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
 घोसरी:  मूल पोलिस ठाणेअंतर्गत पोंभुर्णा तालुक्यात नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची घटना शुक्रवारी वैद्यकीय तपासणीत उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. लोकेश साईनाथ चुदरी (१९, रा. जुनगाव) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी लोकेश चुदरी याने एका अल्पवयीन मुलीशी एक वर्षापासून जवळीक निर्माण केली होती. ते दोघेही शिक्षणासाठी ये- जा करीत होते. दरम्यान, आरोपीने त्या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शुक्रवारी मुलीच्या पोटात आहेत.

ॐ अचानक दुखू लागल्याने तिच्या आईने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अचल मेश्राम यांनी तपासणी केली असता ती मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर बेंबाळ पोलिसांनी आरोपी लोकेश चुदरी याला अटक केली.

त्याच्याविरुद्ध कलम ३७६ (२) (एन) (आय) भादंवि सहकलम ४ व ६ पोक्सो २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश बनसोड करीत आहे