सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या इसमावर गून्हा दाखल


नागपूर, दि. २७/०३/२०२३ : पोलीस स्टे. मौदा अंतर्गत मटन मार्केट मौदा यातील फिर्यादी हे डैम्ठ मध्ये लाईनमेन या पदावर असुन डैम्ठ चे ग्राहक सचिन अंबादास लारोकर यांनी मागील 06 महीण्यापासुन त्याचे मटन दुकानाचे विज बिल न भरल्यामुळे, त्यांना त्यांचे मटन दुकाणात जावुन बिल भरण्याची समज दिली असता, त्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने, यातील फिर्यादी हे आपल्या सहका- यांसोबत यातील डैम्ठ चे ग्राहक सचिन अंबादास लारोकर यांचे लाईन कट करीत असता, दुकाना समोर उभा असलेला सचिन अंबादास लारोकर चा नोकर आरोपी यांनी फिर्यादी व त्याचे सहकार्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन हातबुक्यांनी मारहाण केली व यापुढे लाईन कट करण्याकरीता आले तर जिवाने मारण्याची धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास- सपोनी प्रमोद चौधरी हे करीत आहे.