राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा तर्फे विदर्भस्तरीय आदर्श पत्रकार सन्मान सोहळा नागपूर येथे आयोजित


*नागपूर :* समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहून लढणाऱ्या पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष निकम व राष्ट्रीय महा सचिव श्री. रमेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले श्री. राजेशजी आर. खोब्रागडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष 'विदर्भ न्यूज इंडिया' 'मीडिया वी.एन.आय' मुख्य संपादक तथा संचालक, 'विश्वगामी साप्ताहिक' जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर MY KHABAR24 चे मुख्य संपादक तथा REBOOST MY KHABAR24 PVT. LTD. कंपनी चे FOUNDER & CEO श्री. प्रितमजी मडावी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष,तथा श्री.कृष्णाजी शेंडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष यांना डिजिटल मीडिया उत्कृष्ट कामगिरी बद्दल यांच्या या कार्याची दखल घेत येत्या २६ मार्च २०२३ ला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोषजी निकम यांच्या हस्ते नागपूर येथे पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मानचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात येत आहे.