गडचिरोली :- गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना हे स्वतः आरमोरी तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डाहाट यांना आपल्या सोबत घेऊन आरमोरी तालुक्यातील शंकरनगर गावाजवळ असलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांच्या उभ्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले हे स्वतः संवेदनशील मनाने पाहून निरीक्षण करित आहेत. संजय मीना हे संविधानीक उच्च पदावर विराजमान असतांना सुध्दा त्यांच्या मनाला थोडासाही अहंकार स्पर्श केलेला दिसून येत नाही.
संजय मीना हे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाल्यापासून सर्व सामान्य माणसाचे, शेतकरी बांधवांच्या समस्या विनाविलंब सुटायला लागल्या आहेत. आपण कितीही मोठ्या संविधानीक पदावर असलो, तरी आपन जनतेचे खरे लोक सेवक आहेत ही जिल्हाधिकारी संजय मीना यांची आंतरिक भावना आहे.
जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या प्रेमळ, मनमिळाऊ स्वभाव, सामान्य माणसाबद्दल असणा-या आपुलकी,जिव्हाळा, कर्तव्य तत्पर ,आणि सचोटी बध्द न्याय देण्याचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन आदि गुणांमुळे जिल्हा वासीय लोकांचे अल्पावधीतच लोकप्रिय जिल्हाधिकारी व आदर्शाचे धनी ठरले अशी सुखमय व आनंद मय चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र शासन यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हातून आतापर्यंत जिल्ह्यात झालेल्या विधायक कामाचा सन्मान पूर्वक गौरव करण्यात यावा . तसेच आरमोरी तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डाहाट यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा.
तसेच जिल्हाधिकारी संजय मीना यांना या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जवळ जवळ दोन वर्षे बदली करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र शासन यांच्याकडे डॉ. नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विदर्भ अध्यक्ष बहुजन असंघटित कामगार आघाडी संघ यांनी पत्रकाद्वारे मागणी केली आहे.
तसेच जिल्हाधिकारी संजय मीना व तहसीलदार डाहाट यांच्या हातून भविष्यात विधायक कार्य घडो अशी मंगलमय हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.