निराधारांच्या मानधनात ५०० रूपयांची वाढ!



गडचिरोली : निराधारांना आधार मिळावा, त्यांना जगताना अडचण येऊ नये, यासाठी शासनाकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सह अन्य योजना राबवील्या जातात. जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत २ लाख ६० हजार २९९ लाभार्थ्याना लाभ मिळतो. या योजनांच्या माध्यमातून आज पर्यंत एक हजार रूपयांचे मानधन दिले जात होते. आता त्यामध्ये ५०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. महागाईच्या काळात एक हजार रूपयामध्ये काहीच भागत नसल्याने मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी लाभार्थ्याकडुन सातत्याने केली जात होती. ९ मार्चला सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये नीराधाराच्या मानधनामध्ये ५००

रूपयाची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली यामुळे काही प्रमाणात का होईना लाभार्थ्याना दिलासा मीळाला आहे. माञ महागाई मध्ये ही वाढ कमी असल्याचे निराधारात चर्चा आहे.

महिन्याच्या पहील्याच

आठवड्यात मिळणार पैसे निराधाराना आधार म्हणून या योजना असल्या तरी या योजनाचे मानधन लाभार्थ्याना दर दोन महीन्यात मिळत नाही. त्यामुळे अनेकवेळा त्याना यासाठी बँकेत चकरा माराव्या लागतात. आता माञ महिन्याच्या पहील्याच आठवड्यात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.