झाडीपट्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार


चंद्रपूर :- झाडीबोली साहित्य मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झाडीपट्टीतील ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून सहा ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

झाडीबोली साहित्य मंडळ गोंडपिपरी शाखेचा वर्धापन दिन येत्या २६ मार्च रविवारला खैरे कुणबी समाज भवन येथे राजुरा निर्वाचन क्षेत्राचे आ.सुभाष धोटे तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. गोंडपिपरी तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभला असून तालुक्यातील ज्येष्ठ रंगकर्मी उद्धव नारनवरे तोहोगाव, राजेश्वर कोहपरे वढोली, पत्र सांगडे धाबा,झावरु फुलझेले बोरगाव, ओमाजी पाटील पिंपळकर विठ्ठलवाडा,दयानंद सिडाम गोंडपिपरी यांचा वर्धापनदिनी सत्कार करण्यात येणार आहे.