मुलाने ट्रॅक्टरचे वादातून जन्मदात्या बापाचा केला खून


तिरोडा तालुक्यातील बोदा येथे मुलाने ट्रॅक्टरचे वादातून जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना आज दिनांक 25 रोजी घडली असून खून झाल्यानंतर मुलगा फरार झाला असून दवनीवाडा पोलीस त्याचा शोध घेत आहे.

तालुक्यातील बोधा येथील मृतक भैय्यालाल नागदेवी 55 वर्ष याला दोन पत्नी असून तो आपले मोठ्या पत्नीसह गावातील बौद्ध विहारात राहत होता तर त्याचा लहान मुलगा दुसरी पत्नीसह गावात राहत होता यांच्यात नेहमीच लहान मोठे वाद होत असून काल दिनांक 24 रोजी लहान मुलगा लंकेश याने शेतीचे काम करता भैय्या लालचा ट्रॅक्टर आणला होता आज दिनांक 25 रोजी भैय्यालाल ट्रॅक्टर परत नेण्यास गेला असता लंकेश व भैय्यालाल यांच्यात वाद झाल्यावर रागाचे भरात लंकेश भैय्यालाल नागदिवे यांनी काठीने वडिलांना मारहाण करण्यात केल्याने डोक्याला जवळ जखम होऊन भैय्यालालचा जागीच मृत्यू झाला तर मृतकाचे पत्नीस लोकेश याने जिवे मारण्याची धमकी देऊन घटना स्थळा वरुन पळ काढला घटनेची माहिती होताच दवनीवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव यांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शव विच्छेदना करता पाठवून मृतकाचे पत्नीचे तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी आरोपी लंकेश भैय्यालाल नागदेवेचे विरोधात भादवी कलम 302, 504 नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध दवणीवाडा पोलीस घेत आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.