शिक्षक मित्र परिवाराचे वतीने केंद्रप्रमुख श्री एस पी मेश्राम यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार


श्री एस पी मेश्राम यांचा सत्कार करताना श्री नानाभाऊ नाकाडे तथा इतर मान्यवर.


मालेवाडा :  कुरखेडा अंतर्गत केंद्र मालेवडा येथिल पाणपोई व मोफत सरबत चे वितरण खोब्रामेंडा देवस्थान येथे शिक्षक मित्र परिवार तर्फे 2007 पासून करण्यात येत आहे.त्या निमित्त सामोरे होऊन शिक्षण विस्तार अधिकारी आबाजी आत्राम यांनी धुरा सांभाळली.ते बदलून गेल्यावर केंद्रप्रमुख श्री एस पी मेश्राम यांनी 2015पासून धुरा सांभाळली. ते ऑक्टोंबर ला सेवानिवृत्त झालेत.
    दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी रामनवमी निमित्त पाणपोई आयोजन करण्यात आले.त्या ठिकाणी माजी जि प सदस्य तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती मा. नानाभाऊ नाकाडे उद्धाटक तर माजी शिक्षण विस्तार अधिकारी आबाजी आत्राम अध्यक्ष लाभले,प्रमुख अतिथी माजी प स सदस्य श्री तुळशीराम बोगा, माजी प स उपसभापती श्री रामजी दुगा, मुख्याध्यापक श्री लांजेवार ,विनोद मडकाम इत्यादी लाभले.
    त्यात मान्यवरांचे हस्ते नियोजित सत्कार मूर्ती केंद्रप्रमुख एस पी मेश्राम यांचा सेवानिवृ्तीनंतर सत्कार करण्यात आला.
    तसेच नवनिर्वाचित प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था चे संचालक श्री जितुभाऊ सहाळा,श्री.गौतम लांडगे,रवी गावंडे,श्री मुलचंद शिवणकर,श्री तुळशीराम नरोटे,श्री खुशाल भोयर, कु. कमल गावडे, श्री केशव परवते , अनिल उईके, कू रेश्मा कगाली , कू हेमलता कुमरे इत्यादी संचालकांचा या निमित्त सत्कार करण्यात आला.
     तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री आबाजी आत्राम हेही नुकतेच सेवा निवृत्त झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
  कार्यक्रमाचे यश्यवितेसाठी श्री.बालाजी मुंडे, मालेवडा येथील सरपंच अनुसया पेंदाम कू संगीता नंदा गवळी,श्री दिगंबर रामटेके,श्री रमेश खारकर, प्यारेलाल दाऊदसरिया,श्री देवदत्त गावले, प्रमोद संगमवार,श्री राजेश उईकें, अनिल कोल्हे, लक्ष्मण हलामी,श्री संजय कांबळे, मालेवाडा/अंगारा केंद्रातील शिक्षक इत्यादी ने सहकार्य केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अंकरशहा मडावी यांनी तर आभार रोहिदास मोहुर्ले यांनी मानले.