मालेगावात २६ मार्च रोजी होणारी मा.उद्धव ठाकरेंची सभा ऐतिहासिक होणार!
आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांविषयी जनतेमध्ये जी प्रचंड सहानुभूतीची लाट आलेली आहे त्याचे कारण एका निष्कपट स्वभावाच्या माणसासोबत छलकपट करून त्याला एकाकी पाडून सत्ता पदे भोगणाऱ्या लोकांच्या सत्तेच्या आणि असत्याच्या कर्म कहाण्या उद्धव ठाकरे साहेबांच्या तोंडून ऐकण्याचे प्रचंड कुतहल जनतेच्या मनात आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या सर्व बेसहारा लोकांना साहेबांनी जवळ केले आपलेसे केले त्यांना सहारा दिला,आधार दिला, घरात आसरा दिला निवारा दिला, मान दिला ,सन्मान दिला ,पदे दिली ,स्वाभिमान दिला,त्याच लोकांनी आसरा देणाऱ्या घरमालकाला घरातून हुसकावून लावण्याचे नीच कृत्य केले.त्याच्या घरावर दावा दाखल करून त्यावरच आपला मालकी हक्क दाखवून त्याला बेघर करण्याचे कुटील कारस्थान केले. त्याचेच अन्न खाऊन आणि अन्नाच्या शपथा घेऊन दुसऱ्या दिवशी फ़ंदफितुरी करून गुवाहाटीला पसार झाले आणि हिंदुत्वाची केविलवाणी हाकाटी देत कामाख्या देवीसमोर पापक्षालन करू लागले अशा फितुरांचे बेगडी हिंदुत्वाचे,सभ्यतेचे,पोकळ निष्ठेचे शालीनतेचे बुरखे फाडून त्यांच्या मलीनतेचे ,भ्रष्टतेने आणि गद्दारीने बरबटलेले खरे चेहरे खुद्द मा.उद्धव साहेबच जनतेसमोर आणणार म्हटल्यावर उत्तर महाराष्ट्रातील सर्व लोकांमध्ये प्रचंड कुतूहल राहणारच.हे कुतूहल मा उद्धव साहेबांच्या प्रत्येक सभेच्या गर्दीचा उच्चांक मोडत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे

26 मार्च रोजी मालेगावात होणारी सभा म्हणूनच ऐतिहासिक ठरणार आहे याचे आणखी एक कारण म्हणजे *रात्री अन्नाची शपथ घेऊन निष्ठेपोटी, भगव्यासाठी सत्ता,पदाचा त्याग करण्याची भीष्मप्रतिमा करणारा आधुनिक राजकीय भीष्माचार्य आपल्या मालेगावात गेल्या अनेक वर्ष्यापासून राजकारण करत आहे त्यांच्याच सुरत तसेच सुरस कथा ऐकण्याची मालेगाव बाह्य तसेच तालुक्यातील जनतेमध्ये कमालीची आतुरता जाणवत आहे.*

 जे लोक शपथा मोडू शकतात,मोका पाहून धोका देऊ शकतात,ज्यांनी जवळ केले मोठे केलं त्यांना सत्तेसाठी सोडू शकतात स्वार्थासाठी जनमताची चोरी करू शकता, निष्ठावान शिवसैनिकांसोबत हरामखोरी करू शकतात अशा सर्व प्रवृत्ती राजकीय क्षेत्रातून कायमच्या हद्दपार झाल्या पाहिजे या मतापर्यंत जनता येऊन पोहचली आहे.म्हणूनच यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्याचा चंग जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी बांधलेला आहे त्यासाठी जंग जंग पछाडण्याच्या त्यांच्या शिवनिष्ठेला पक्ष प्रमुख 26 तारखेला बळ देतील जेणेकरून पुढच्या निवडणुकीनंतर अथवा निवडणुकीपूर्वीच या प्रवृत्ती पळ काढल्याचे चित्र तालुक्यात बघावयास मिळेल.

लबाड बोलून,वागून अमाप घबाड कमवायचे अन कमावलेले घबाड लपवण्यासाठी तपास यंत्रणांचा ससेमिरा चूकविण्यासाठी मोका पाहून गाव ते गुवाहाटी असे तोंड लपवत फिरायचं आणि शेवटी राजकीय तोडीपाणी करून हिंदुत्व अन निष्ठा सारखे पालुपद लावून धरण्याचे सोंग करायचे या सर्व हुशारक्या आणि फुशारक्या न समजण्या इतपत जनता दूधखुळी नक्कीच नाही .एक मात्र नक्की की या सर्व पाठशीवणीच्या खेळात भोळ्या भाबड्या जनतेच्या बेरोजगार युवकांच्या शेतकरी, कामकरी कष्टकरी या सर्वांच्या आशा अपेक्षांचा मात्र पुरता चुराडा होत असताना दिसत आहे आणि आपला गाव तालुका विकासात्मक कार्यातून मागे मागे फेकला जात आहे हे भीषण भयानक वास्तव नाकारून चालणार नाही परंतु आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे *आता अशा गद्दारांना माफी नाही म्हणजे नाहीच* अशी खूणगाठ येथील जनतेने बांधलेली दिसते आणि म्हणूनच स्वयंस्फूर्तीने तालुक्याची जनता तरुण आबाल वृद्ध घरोघरीं जाऊन 26 मार्चच्या सभेचा प्रचार प्रसार करताना दिसत आहेत आणि यासारख्या अनेक कारणांमुळे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सभा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक होणार आहे अशी जवळजवळ सर्व जनतेची राजकीय जाणकारांची पक्की धारणा आणि विश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे...