अँड. बोधी रामटेके यांचा सत्कार सोहळा १ एप्रिलला. कार्यक्रमासाठी वर्गणी पाठविण्याचे धर्मानंद मेश्राम यांचे आवाहन
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली

 गडचिरोली :--जगातील केवळ १५ विध्यार्थाना मिळणाऱ्या जागतिक दर्जाच्या ' इरस्मस मुंडुस ' युरोपीयन स्कॉलरशिप साठी १५विध्यार्थापैकी एक अश्या गडचिरोली सारख्या आदिवासी जिल्ह्यातील चामोर्शी येथील हुशार' जिज्ञासू , व चिकित्सक २५ वर्षाचा तरुण तडफदार प्राचार्य शाम रामटेके यांचा सुपुत्र अँड. बोधी शाम रामटेके यांचा सत्कार सोहळा दि . १ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ४वाजता बळीराजा पॅलेस चामोर्शी रोड. गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. अँड. बोधी शाम रामटेके यांच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख तथा सामाजीक कार्यकर्ते विलास निबोंरकर हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन , मावा नाटे मावा राज ,चे प्रवर्तक तथा आदिवासी समाजाचे गाढे अभ्यासक डॉ. देवाजी तोफा , मेंढा ( धानोरा ) आंबेडकरी चळवळीतील गाढे अभ्यासक नरेन गेडाम ,सावली अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राजकीय गाढे अभ्यासक , समाजसेवक रोहिदास राऊत हे उपस्थित राहणार आहेत. अँड. बोधी यांनी जगातील १५ हुशार विध्यार्थामधे एक म्हणुन आपले स्थान पटकावले असुन आदिवासी गडचिरोली जिल्हयासाठी ही बाब अत्यंत भुषणावह व प्रेरणादायी बाब असुन अश्या या होतकरू तरुण , तडफदार युवकाला प्रोत्साहित करण्यासाठी या सत्कार सोहळ्या प्रसंगी तमाम आंबेडकरी अनुयायांनी व नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरीता कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सोशल एज्युकेशन मुवमेन्ट महाराष्ट्र , सत्यशोधक फाऊंडेशन' महाराष्ट्र , अनिस शाखा गडचिरोली , जिल्हा माळी समाज संघटना गडचिरोली. आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन गडचिरोली , आदिवासी विकास युवा परिषद' गडचिरोली , संभाजी ब्रिगेड गडचिरोली ' राष्ट्रीय ओबीसी महासंघ गडचिरोली आदींनी केलेले आहे. अश्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी खालील नंबरवर आर्थिक सहकार्य ( वर्गणी ) online pay Number 9 4 2 3 6 2 l l 9 3 या नंबरवर पाठविण्याचे आवाहन धर्मानंद मेश्राम यांनी केलेले आहे.