अल्पवयीन पीडितेवर बळजबरी अत्याचार करणाऱ्या गडचिरोली येथील सूरज कांबळे यास अटकवर्धा :- अल्पवयीन पीडितेवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी आरोपी नराधमाला गडचिरोली येथून अटक केली. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सूरज कांबळे रा. गडचिरोली असे अटक केलेल्याचे नाव आहे.


१२ वर्षीय अल्पवयीन पीडिता ही घराबाहेर माकडे ( वानर) हाकलण्यासाठी निघाली असता सूरजने तिला जवळ बोलावून जबरदस्तीने नजीकच्या शेतात नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.सूरज गडचिरोली वरून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात थ्रेशर मशीनवर काम करण्यासाठी आला होता. काम संपल्यानंतर त्याने हे क्रूर कृत्य करून गडचिरोलीला पलायन केले होते.

याप्रकरणी पीडितेच्या जबाबनूसार सेलू पोलिसांनी तक्रार नोंदवून सूरज कांबळेवर गुन्हा दाखल केला. सूरज गडचिरोली येथील रहिवासी असल्याने पोलिसांनी याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली होती. दरम्यान गडचिरोली पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सेलू पोलिसांना माहिती दिली. सेलू पोलिसांचे पथक गडचिरोली येथे येऊन राहूल कांबळे यास अटक केली. न्यायालयाने राहूल यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहेत.

आभर साम टिव्ही