वैरागड येथे महिला मेळावा व सभा मंडप लोकार्पण सोहळा..." महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना" -कृष्णा गजबे


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 


आरमोरी/ वैरागड:
    *संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी आणि सक्षम राष्ट्र उभारणीच्या कार्यात महिलांचा मोलाचा वाटा असल्याने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने विविध योजना सुरू केल्या असून आता महिलांना एसटी प्रवासात अर्धे तिकीट, लेक लाडकी नावाच्या योजनेत मुलीच्या जन्मापासून टप्प्याटप्प्यात आर्थिक सानुग्रह मदत 36 लाख ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे यासारख्या अनेक उपाययोजना राज्य सरकारकडून करीत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार सकारात्मक आहे. असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.*    *वैरागड येथे महिला मेळावा व इंदिरा गांधी चौकात नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडळाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरमोरीचे तहसीलदार कल्याण कुमार डाहाट होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी चेतन हिंवग पोलीस निरीक्षक संदीप मांडलीक, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, भाजपा प्रदेश ओबीसी महिला आघाडीच्या सदस्य संगीता रेवतकर, सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, मुख्याध्यापिका प्रतिभा रामटेके, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, माजी जि. प. सदस्य के.तू. गेडाम, पुनम गुरनुले, महादेव दुमाने ,केंद्रप्रमुख राजेश वडपल्लीवार ,मुखरू खोब्रागडे, लक्ष्मण लाडे, बालाजी पोपळी, ग्रा.प. सदस्य सत्यदास आत्राम, आदेश आकरे, विलास तागडे, छानू मानकर, प्रतिभा बनकर, दिपाली ठेंगरे, मनीषा खरवडे, संगीता मेश्राम ,वर्षा चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.*       *याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेतील विजेत्यांना याप्रसंगी आ. गजबे तहसीलदार कल्याण कुमार डहाट यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. सभा मंडपाचे उद्घाटन करताना आ. गजबे तहसीलदार कल्याणकुमार दहाट*.