शिर्डी येथील महापशुधन एक्सोला भेट देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून शेतकरी रवानाजिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दाखविली हिरवी झेंडी


गडचिरोली,(जिमाका)दि.20: राज्यशासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी ता.राहता,जि.अहमदनगर येथे दिनांक 24 ते 26 मार्च या कालावधीत महापशुधन एक्सो-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या पशु प्रदर्शनास जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी गडचिरोली, विभागा मार्फत नियोजन केले आहे. जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय पशुपालक एक्स्पो साठी उपस्थित राहण्यासाठी काल तिकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी,संजय मीणा यांनी निघालेल्या सर्व पशुपालक शेतकऱ्यांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून वाहन मार्गस्थ केले. यावेळी त्यांनी एक्सपो मधील माहिती अवगत करून आपल्याही जिल्ह्यात विविध योजनांमधून दुधाळ जनावरांची वाढ करावी असेही आवाहन त्यांना केले. जिल्ह्यातील महिला विकास महामंडळ, आत्मा, तसेच दुग्ध व्यवसाय सोसायट्यांचे सदस्य, बचत गटाचे सदस्य शेतकरी यांचा समावेश आहे.

हे प्रदर्शन 46 एकर जागेवर होणार असून यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यामधील उत्कृष्ट पुशधन, पशुपक्षी सहभागी होणार आहे. या प्रर्दशनातुन पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे अशी माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव यांनी दिली आहे. यावेळी आत्मा प्रकल्प व्यवस्थापक तथा कृषी विज्ञान केंद्राचे विभाग प्रमुख श्री. कराळे उपस्थित होते.