मामी झाली भाच्याच्या प्रेमात वेडी,नंतर पळून जाऊन केले लग्न अन मग…


प्रेमामध्ये काही पण शक्य असतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. ही घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये चक्क मामाने आपल्या पत्नीचे भाच्यासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर जे पुढे झाले ते मात्र तोंडात बोटे घालण्यासारखेच आहे.ममता नावाची महिला गावात राहायची.ममता हिचा विवाह राजेंद्र याच्यासोबत काही वर्षांपूर्वी झाला होता.

या दोघांचा संसार सुरळीत सुरू असतानाच राजेंद्र याचा भाचा गौतम हा त्यांच्या घरी यायला जायला लागला. त्यामुळे ममता कुमारी हिच्या सोबत देखील गौतमची ओळख झाली. गौतम आणि त्यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण झाले.मात्र, हळूहळू ममता कुमारी हिला गौतम विषयी प्रेम वाटू लागले.त्यानंतर दोघांमध्ये प्रेम जडले. दोघांनी अनेकदा संबंध देखील प्रस्थापित केले.

त्यानंतर हे प्रकरण राजेंद्र याला कळाले. त्यामुळे राजेंद्र याने ममता कुमारी आणि गौतम यांचा विवाह लावून देण्याचे ठरवले. त्यानंतर या दोघांनी विवाह देखील केला. काही दिवस दोघांनी आनंदात काढले. मात्र, नंतर या दोघांची भांडण व्हायला लागली. त्यामुळे गौतम हा मामीला सोडून पळून गेला. त्यानंतर ममता ही पुन्हा एकदा राजेंद्र याच्याकडे आली आणि मला गौतम सोडून गेला, असे सांगू लागली.

त्यानंतर देखील राजेंद्रकुमार याने आपल्या पत्नीला मोठ्या मनाने स्वीकारले आणि झाले गेले विसरून जा आणि माझ्यासोबत त्याचा आनंदाने राहा, असे सांगितले. त्यामुळे त्याच्या औदार्याची याची चर्चा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.