वडधा: आरमोरी तालुक्यातील नरोटीमाल येथे २६ मार्च रोजी एका वृद्धाचा मृतदेह विहिरीत कुजलेला आढळून आला. मृत्यूमागील कारण अस्पष्ट असून मयत मनोरुग्ण असल्याची माहिती आहे.
बारीकराव का कुमरे (६३, रा. वानरचुवा ता. आरमोरी) असे मयताचे नाव आहे. नरोटीमाल शिवारात रामदास मडावी यांचे शेत आहे. ते गुरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले तेव्हा विहिरीतून दुर्गंधी आली. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता आहेत.
कुजलेला मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. आरमोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीबाहेर काढून ओळख पटवली. उपनिरीक्षक दिलीप मुनघाटे, हवालदार केशव केंद्रे तपास करीत
आहे.
मुलीच्या घरातून बेपत्ता
■ मयत बारीकराव कुमरे हे मानसिक रुग्ण होते. कफल्लक अवस्थेत ते फिरत असत. मुलगी रेवता नरेंद्र तुलावी (रा. पिपरटोला ) हिच्या घरातून १२ दिवसांपूर्वी ते बेपत्ता झाले होते. ते विहिरीत पडले की उडी घेतली, हे अस्पष्ट आहे