दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाच्या आढावा व नियोजन बैठकीला महामंत्री अनुसुचित जनजाती खा. अशोक नेते यांची उपस्थिती.


गडचिरोली:- दिल्ली प्रदेश कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाची आढावा व नियोजन बैठक मोर्चाचे आदरणीय भाजपाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बि.एल.संतोष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मोर्चाचे राष्ट्रीय संघटक व्हि.सतिशजी, मोर्चाचे अध्यक्ष समीर ओराव (राज्यसभा खासदार), मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीप शैकिया यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

गुढीपाडव्याच्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत या आढावा व नियोजन बैठकीची सुरुवात केली. या बैठकीत अनु.जनजाती मोर्चा च्या विविध क्षेत्रातील समस्या व सविस्तरपणे विस्तारित विविध विषयांवर चर्चा करून बैठक घेण्यात आली.

या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,
भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष, मोर्चाचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार व मोर्चा प्रभारी दिलीप शैकिया, महेंद्र पांडे, केंद्रीय कार्यालय मंत्री, भाजपा तसेच बैठकीला राष्ट्रीय पदाधिकारी, राज्यांचे प्रभारी व प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती होती.