ब्रह्मपुरी : लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरू युवकाने तरुणीच्या डोक्यावर केला हातोडीने वार


चंद्रपूर/ब्रह्मपुरी - जिल्ह्यात 8 मार्चला जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येत होता तर दुसरीकडे एक युवक तरुणीला यमसदनी पाठविण्याची तयारी करीत होता. Crime news


लग्नाला नकार दिला म्हणून एका माथेफिरू युवकाने तरुणीच्या डोक्यावर हातोडीने वार केला, या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती, पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. Breaking news
8 मार्चला दुपारी 2 वाजता NH कॉलेजसमोरील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ आरोपी लवेश वामन देऊळकर रा. नानहोरी ने पीडित तरुणी आपल्या आईसोबत बोनडेगाव ला जात असताना तरुणीच्या डोक्यावर हातोडीने वार केला. Crime alerts
recommended by

घटना काय?

आरोपी लवेश हा पीडित तरुणीच्या आईचा मानलेला भाऊ होता, मात्र त्याची वाईट नजर तरुणीवर असल्याने तो तिच्यासोबत लग्न करण्याची मागणी करू लागला, आरोपी लवेश पीडित तरुणीला वेगवेगळ्या मोबाईल नंबरने कॉल करून लग्नाची मागणी करीत होता, मात्र नात्यात तो तिचा मामा लागत असल्याने तिने स्पष्ट शब्दात लवेश ला नकार दिला. Stalking
या गोष्टीचा राग मनात पकडून लवेश ने तरुणीवर प्राणघातक हल्ला केला.
पोलिसांनी आरोपी लवेश वर कलम 307, 354(ड) व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे करीत आहे.