गडचिरोलीत कर्मचारी संपाचा एल्गार कायम.,पेरमिली आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग.




गडचिरोली:- एकच मिशन,जुनी पेन्शन यासाठी पुकारलेला संपाचा एल्गार तिसऱ्याही दिवशी कायम होता.राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्था ,निमशासकिय कर्मचाऱ्यांनीही एकजुटीचा परिचय दिला.आता नाही तर कधीच नाही.अशी घोषणा देत पेन्शन घेऊनच परतायचे असे कर्मचारी हट्टाला पेटले आहेत.तर , राज्य सरकारने मेस्मा लागू करण्याचा दिलेला इशाराही नाकारत असल्याचा कर्मचाऱ्यांनी इरादा केला आहे. तहसिल कार्यालय ते गडचिरोली जिल्हाधिकारी पर्यंत पैदल मार्च रँली काढण्यात आले.व जिल्हाधिकारी गडचिरोली यांना संघटनेच्या मार्फतीने निवेदन देण्यात आले.
गडचिरोली तहसिल कार्यालया समोर गुरूवारला तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. गडचिरोलीतील वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी वर्ग संपाला जोरदार पाठिंबा दिला आहे.जुनी पेंशन हा अधिकार असून तो मिळावा यासाठीचा लढा यशस्वी करण्याचा संघटनांचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारने वेळकाढूपणा करू नये. अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.सरकार चर्चेला बोलावून प्रश्न निकाली काढण्यासाठी करीत टाळाटाळ असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांचा आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे . कर्मचाऱ्यांना काम ठप्प करायचे नसून , त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.त्यासाठीच संप यावेळी यशस्वी करूनच परतायचे असा सर्वांनी निर्धार केला आहे.या संपाला गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागाचे ग्रामिण भागातुन आलेले सर्व शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला तसेच पेरमिली आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.