अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला बलात्कार

आरोपी फरार घोट मदत केंद्रात गुन्हा दाखल

घोट : ठाकूरनगर येथे दुपारच्या घोट सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या तरुणावर १२ मार्च रोजी घोट पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरुण विजेंद्र मंडल (२८) राहणार ठाकूरनगर, असे आरोपी तरुणाचे नाव आहे. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते १: ३० वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरी एकटी होती. ही संधी साधून वरुण मंडल याने त्या मुलीच्या घरी प्रवेश केला. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून व

तिचे तोंड दाबून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असे मुलीने पोलिसात दिलेत्या तक्रारीत व बयाण्यात म्हटले. त्यानुसार आरोपीविरुद्ध कलम ३७६, ५०६ व बाल लैंगिक पॉक्सो कायदा कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेष म्हणजे, सदर प्रकरणातील आरोपी वरुण मंडला हा फरार आहे. प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा व घोट पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शेंढे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक जनार्धन काळे करीत आहेत.