हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाने अर्ध्यावरती डाव सोडला.वर्धा: लग्न चार दिवसांवर येऊन ठेपलेले. पण वाद उसळून आल्याने हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाने अर्ध्यावरती डाव सोडला.

सेलू तालुक्यातील झडशी या खेड्यातील रोशन गणपत लिडबे या युवकाचे लग्न नागपूर जिल्ह्यातील कान्होली बारालगत असलेल्या किनी भानसुली या गावातील मुलीशी जुळले होते. दोघांचा साक्षगंध आटोपून चार दिवसांवर आलेल्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना काही विघ्न आले. ते दूर करण्यासाठी रोशन सासुरवाडीतील मंडळींची समजूत काढण्यासाठी भानसुलीला पोहचला. इथे काय घडले ते पुढे आले नाही. मात्र, त्यानंतर लगेच रोशनने त्याच गावात विष प्राशन करीत आत्महत्या केली. त्याच्या घरी झडशीला ही माहिती जाताच सर्वांनी हंबरडा फोडला.

त्याच्या घरच्यांनी हिंगणा पोलीसांकडे तक्रार करीत ही आत्महत्या संशयास्पद असून चौकशीची मागणी केली आहे. नागपूर पोलीस अधीक्षक यांनाही तक्रार देण्यात आली आहे.