शहीद दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादनगडचिरोली,(जिमाका)दि.23: भगतसिंग,राजगुरु,आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
     यावेळी तहसिलदार, संजय रामटेके, नायब तहसिलदार, संगिता धकाते, जिल्हा नाझर, आशिष सोरते, श्री.चहांदे,आदी उपस्थित होते. नंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगतसिंग,राजगुरु,आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
******