कढोली येथील तुकाराम विद्यालयाजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडकेत एक ठार तर दोघे गंभीर जखमी



कुरखेडा : तालुक्यातील कढोली येथील तुकाराम विद्यालयाजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात  एकजण ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

गिता मारोती सहारे असे मृतक महिलेचे नाव आहे. तर प्रफुल पुरूषोत्तम सहारे व ललिता दिलीप धोंडणे अशी जखमींची नावे आहेत. कुरखेडा - वैरागड मार्गाने कार क्रमांक

सीजी ०४ एचसी ५०४९ सावलखेडाकडे जात असताना याच वेळी विरुद्ध दिशेने दुचाकी क्रमांक एम एच ३३ एक्स ११६३ ही येत

दरम्यान कढोलीच्या तुकाराम विद्यालयाजवळ दोन्ही वाहनात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील रघु/प्रफुल पुरूषोत्तम सहारे(17), गिता मारोती सहारे(50), ललिता दिलीप धोंडणे(50) रा. शिरपूर हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच रुग्णवाहिकेने प्रथम कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल

करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आले. दरम्यान रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान गिता सहारे यांचा मृत्यू झाला. कारमध्ये असलेल्या व्यक्तींची नावे कळू शकली नाही. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटिल यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देवराव भांडेकर करीत आहेत.