🗣️ गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. त्याचप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
💁♂️ *वाचा सविस्तर*
⚡ पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे १५ जिल्ह्यांना अलर्ट देखील जाहीर करण्यात आला.
📝 राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.