मौजा नविनटोला येथे नविन डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन*


दिनांक १५/०३/२०२३ रोज बुधवार ला मौजा नविनटोला येथे नविन डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन जि.प.सदस्य श्रीकांतभाऊ घाटबांधे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी पं.स.सदस्य फुलचंदभाऊ बागडेरिया,प्रितमभाऊ रामटेके सदस्य ग्रा.पं परसटोला सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी तथा नविनटोला येथील ग्रामवासी उपस्थित होते.
            यावेळी मनोगत व्यक्त करताना मी जेव्हा जि. प. सदस्य निवडणुकीच्या आधी संपूर्ण जि. प. क्षेत्राची पाहणी केला तेव्हा जवळपास संपूर्ण क्षेत्रात दैनिय अवस्था पाहण्यास मिळाली.. तेव्हा मला कळलं की, आपण ह्या शोषित, पिडीत, आदिवासी समाजाचा आवाज बनून यांना विकासाच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात आणायचं आणि प्रत्यक्षपणे निवडून येऊन वर्ष पूर्ण झाले परंतु जि. प. चे कार्यकाळ/कामकाज जुन महिन्यात सुरू झाले.. ६ महिने जवळपास पूर्ण झाले.. अशा प्रकारे लोकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक पणे प्रयत्न केले.. आज मला खूप आनंद होत आहे.. ज्या गावाला येथील लोकप्रतिनिधीने वाडीत टाकले होते.. पण आम्ही प्रत्येक्षरीत्या तिथे जाऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.. आणि आज त्या कामाचा भूमिपूजन करून काम सुरू झाले..मागच्या वर्षांपासून असे अनेक लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांचे वयक्तिक काम करून दिले.. एवढंच नाही तर विकास कामाचे २०-२५ भूमिपूजन करून कामे प्रगती पथावर आहेत.. अजून माझ्याकडे ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे.. या काळामध्ये लोकांचे प्रत्यक्ष पणे वयक्तिक लाभ देण्याचा प्रयत्न करेन.. असाच आपला आशिर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असू द्या.आम्ही देणार विकास कामाचा हिशोब.असे प्रतिपादन त्यांनी केले.
         केशोरी क्षेत्र हा अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्र आहे.जिल्हा निर्माण झाला तेव्हापासून अनेक लोकप्रतिनिधी आले परंतु क्षेत्राच्या विकासाला बहर आली नाही परंतु तरुण तडफदार जिल्हा परिषद सदस्य या क्षेत्राला लाभला आणि विकासाची तळमळ आतापासूनच आपल्या कार्यातून सिद्ध करण्याचे प्रयत्न श्रिकांतभाऊ करत आहेत.त्यांच्या कार्याने क्षेत्रातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.