मोहझरी ग्रामपंचायत वतीने जाहीर आवाहन


मोहझरी: .ग्रामपंचायत कार्यालय मोहझरी कडून सर्व टॅक्स धारकांना सूचित करण्यात येते की, आता लवकरच आर्थिक वर्ष संपत असून आपणाकडे वारंवार भेट देऊन सुद्धा आपण नुसते निमित्त सांगून वसुली देण्यास टाळाटाळ करीत आहात असे दिसते, पण टाळाटाळ करू नका, कारण गावाचा विकास आपल्या साहाय्याने होत असतो आपण घरटॅक्स, पानिटॅक्स न भरल्यास पाणी व इतर सोयीसुविधा बंद झाल्यास आपणास त्रास होतो.

टॅक्स थकीत झाल्यास सुद्धा दंड, व्याज, प्रमाणपत्र न मिळणे अश्या समस्यांना ग्रा. पं. मध्ये सामोरे जावे लागते, म्हणून आपणास हात जोडून नम्र विनंती आहे की, आपणाकडे असणारे घरटॅक्स, पानिटॅक्स ग्रामपंचायतमध्ये त्वरित भरून गावाच्या विकासाला आपला मोलाचा हातभार लावून ग्रा. पं. प्रशासनास मदत कराल हिच अपेक्षा धन्यवाद.

वेळेवर टॅक्स भरा आणि सहकार्य करा

ग्रा. पं. कार्या. मोहझरी