अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण जखमी


अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील रमेश सोमा गंधम व बाबुराव मल्लय्या रामटेके हे कोपेवांच्या येथे तेरवीच्या कार्यक्रमाला जाऊन येत असताना कोपेवनच्या जंगल परिसरात अस्वलाने अचानक हल्ला केला त्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून सदर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे उपचार सुरू झाले आहे ही माहिती अहिरी तालुका अध्यक्ष डॉक्टर निसार हकीम ज्यांना माहीत होताच रुग्णालयात जाऊन दोघा रुग्णाची भेट घेतली याप्रसंगी तालुकाध्यक्ष डॉक्टर निसार हकीम, मधुकर सडमेक, राघोबा गौरकर, नामदेव आत्राम, अशोक आईंचवार. रज्जाक पठाण, गणेश उप लपवार, श्रीराम प्रसाद मुंजुमकर यांनी शासकीय रुग्णालयात भेट घेऊन रुग्णाची विचारपूस केली, त्यांना त्वरित वनविभाग कार्यालय कडून आर्थिक मदत मिळण्या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी रेपनपल्ली यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून रुग्णांना तात्काळ सहायता करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे