अर्सोडा-आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन कारण्यांत आले होते, याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायस मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी ज्ञान यज्ञ व ज्ञानार्जनाचे महत्व पटवून देतांना सांगितले की, या ज्ञानार्जन सोहळ्यात युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायला पाहिजे जेणेकरून उचित ज्ञानार्जन करून चांगले व उत्कृष्ट नागरिक होता येईल. युवावस्थेमध्येच याची गरज असून आपले जीवन घडविण्याची हि एक मोलाची संधी असते. आजच्या स्थितीत धर्माच्या व जातीच्या नावावर भांडण तंटे, हिंसा पसरविण्याचे काम व समाजात विष पेरण्याचे काम काही लोकं करीत असतात त्याला न जुमानता आपण समाजात, घरात, शेजारी, गावात व शहरात सालोख्याचे वातावरण जोपासले पाहिजे, आपापसात प्रेमाने राहायला शिकलं पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले.