मनपा राज्यस्तर खेळाडूंचा गुणगौरव सोहळा संपन्नप्रतिनिधी: दिलीप अहिनवे, मुंबई
मुंबई, दि. १८ : त्रिवेणी संगम मनपा शाळा सभागृहात नुकताच राज्य स्तर खेळाडूंचा गुण गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुंबई महापालिका शाळांतील प्राथमिक विभागातून २३ व माध्यमिक विभागातून ३० विद्यार्थ्यांनी शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. मुंबई महापालिकेतर्फे या गुणी खेळाडुंना स्पोर्ट्स कीट देऊन गौरविण्यात आले.


कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी (माध्य.), उपशिक्षणाधिकारी अजय वाणी (म. ख. खा.), अधीक्षिका आरती खैर, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्राचार्य रवींद्र परदेशी, पर्यवेक्षक दत्तु लवटे व सर्व कनिष्ठ पर्यवेक्षक उपस्थित होते.


शासकीय स्पर्धा प्रमुख म्हणून कनिष्ठ पर्यवेक्षक कुनील सोनवणे, सुनिलदत्त माने, सुरेश भोसले, ललित पाटील व किरण इंगळे यांनी उत्तमप्रकारे काम पाहिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांनी केले तर सुत्रसंचालन पर्यवेक्षक दत्तु लवटे यांनी केले.