अन् त्याने केला दारूच्या नशेत कुऱ्हाडीने वार


चंद्रपूर: जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख हा चढत्या स्वरूपात गेला आहे, या सर्व गुन्ह्यात एकचं साम्य असून ते म्हणजे आरोपी किंवा पीडित हा दारूच्या नशेत असतो. Chandrapur crime news

दारूमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहे, चंद्रपुरातील दुर्गापूर येथे 8 मार्च ला दुर्गापूर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 27 वर्षीय शुभम शशी नायर हा त्याचा मित्र 25 वर्षीय शुभम मंगरू पारधी याच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला होता. Crime news
शुभम नायर ने पारधी यांच्या आईला अश्लील शब्दात शिवीगाळ करू लागला, या प्रकाराने दोघांमध्ये वाद वाढला असता आरोपी शुभम पारधी याने कुऱ्हाडीने शुभम नायरच्या डोक्यावर वार केला.
अचानक झालेल्या हल्ल्यात नायर खाली कोसळला, परिसरातील नागरिकांनी नायर ला जखमी अवस्थेत कोल सिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
सध्या नायर याची प्रकृती गंभीर आहे, पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला नसून पुढील तपास सुरू आहे.