आरमोरी व वडसा येथील ठाणेदारांची बदली..
गडचिरोली :-गडचिरोली जिल्हयातील वडसा _ देसाईगंज पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेश मेश्राम यांची पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे बदली झाली. तर आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार काळंबाधे यांची किटाळी प्रशिक्षण केंद्र कमांडो म्हणुन बदली झाली. वडसा चे ठाणेदार मेश्राम यांच्या कार्यकाळात अनेक तक्रारी होत्या. त्यांच्या तक्रारीच्या अनुसंगाने त्यांची बदली झाल्याचे बोलल्या जात आहे. 

तर दुसरीकडे आरमोरीचे ठाणेदार काळबांधे यांच्या कामाची , व समाज सेवेची अनेकांकडून स्थुति होत असतांना त्यांची बदली होणे म्हणजे एक आश्चर्याचा धक्काच आहे. शेवटी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल साहेबांची मेहरबानी किटाळी प्रशिक्षक केंद्राचे प्रमुख संदिप मंडलीक यांना पोलीस स्टेशन आरमोरी येथे पाठविण्यात आले. तर विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांग पोलीस स्टेशन वडसा ची जबाबदारी देण्यात आली.