असरअल्ली येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 


क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,द्वितीय पुरस्कार पोलीस स्टेशन कडून तर तृतीय पुरस्कार रमेश तैनेनी सरपंच यांच्याकडून..!!

सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथे स्पोर्टिंग क्रिकेट क्लब कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आला होता.या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार तीस हजार रु आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून तर येथील पोलीस स्टेशन कडून वीस हजार रु.द्वितीय पुरस्कार आणि तृतीय पुरस्कार येथील ग्राम पंचायातचे सरपंच रमेश तैनेनी यांच्याकडून ठेवण्यात आले..!!


या क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.या सोहळ्याला सरपंच रमेश तैनेनी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेश गावडे,उपसरपंच सुधाकर मिसरी,बहिराम साहेब,पाटील साहेब आणि सागर कोठारी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या सामन्यात प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकविलेल्या विजेत्या संघांना प्रभारी अधिकारी राजेश गावडे,सरपंच रमेश तैनेनी,उपसरपंच मिसरी सुधाकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या क्रिकेट सामन्यात अनेक संघांनी सहभाग घेतले. सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी स्पोर्टिंग क्लबचे खेळाडू व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले..!!