अन् भाजप नेत्याने समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीला पळवून नेले


सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष हे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी एका प्रेमप्रकरणात मात्र त्यांची युती झाल्याचे दिसून येत आहे. हरदोली येथील एका भाजप नेत्याने समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या मुलीला पळून नेलेले असून घरातून विरोध होईल या भीतीने हे प्रेमीयुगुल घरातून फरार झालेले आहे. विशेष म्हणजे भाजप नेत्याचे वय तब्बल 47 वर्ष असून समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या मुलीचे वय अवघे 26 वर्ष आहे.

समाजवादी पार्टीच्या नेत्याने आरोप करताना भाजप नेत्यांनी आपल्या मुलीला जबरदस्तीने पळून नेलेले आहे असे म्हटलेले आहे. आपल्या मुलीचे लग्न ठरलेले होते मात्र या भाजप नेत्याने आपल्या मुलीला पळून नेले त्यामुळे आमची समाजात बदनामी झालेली आहे. आशिष शुक्ला असे त्याचे नाव असून त्याला तर 21 वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे असेही सांगितलेले आहे तर भाजपकडून मात्र प्रकरण समोर आल्यानंतर आशिष शुक्ला याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असे म्हटलेले आहे.