कोरची : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांची कालबाह्य झालेली निर्लेखित यंत्रसामग्री व साहित्ये / उपकरणे आहेत. दरम्यान, सदर साहित्य भंगारात विकण्यात येणार आहे. इच्छुक निर्लेखित साहित्य खरेदीदारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची येथे त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित राहावे. किमान तीन खरेदीदार उपस्थित होणे आवश्यक आहे. सदर व्यवहाराच्या अटी व विक्री करावयाचे साहित्य संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. जुने साहित्य निरूपयोगी ठरत असल्याने ते आता भंगारात विकले जात आहे.