गडचिरोली :- कॉम्प्लेक्स कृषी कार्यालय परिसरातील झुडपात सकाळपासुनच वाघिणीने तळ ठोकला असल्याची घटना आज २० मार्च रोजी उघडकीस आली आहे व हल्ली झुडपांमध्ये
बसली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गडचिरोली ते चंद्रपूर मुख्य मर्गालगत कॉम्लेक्स परिसरात सकाळी मुख्य मार्गावरून काही लोकांनां वाघीण दिसली. परंतु वाघीण जंगलाच्या दिशेने न जाता बघणाऱ्या लोकांना घाबरून वाघीण कृषी कार्यालयाच्या झुडपी जंगलात घुसली. सदर माहीती वनविभाग व पोलिसांना माहीत होताच दोन्ही विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. त्यापूर्वी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी तोबा गर्दी केली. पोलीसांनी सदर गर्दीला पागंवले. परंतु वाघीण कृषी कार्यालयातील दाट झुडपात हल्ली बसली आहे. वनविभागाच्या सुत्रानुसार सदर वाघीन गरोदर असुन ती गुरवळा-मारोडा सफारी उद्यान मधील असावी असा अंदाज वनविभागा कडून वर्तविण्यात येत आहे. वनविभाग सदर ठिकाणी पिंजरा लावून तळ ठोकून बसले आहेत.तर पोलीसांचा तगडा बंदोबस्त असुन पाहारा देत आहेत. सदर वाघीन सेमाना देवस्थान कडून रात्रोच्या सुमारास आली असावी व सकाळी त्याच मार्गाने जायला निघाली. परंतु रहदारीचा रस्ता म्हणुन वाघीन चक्क कृषी विभाग परिसरातील झुडपी जंगलात तळ ठोकून आहे.