नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने एक जवान शहीद

बिजापूर, 27 मार्च : रस्ते बांधणीच्या कामात सुरक्षा कर्तव्यासाठी जात असतांना नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने एक जवान शहीद झाल्याची घटना बिजापूर जिल्ह्यातील मितूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सीएएफ (छत्तीसगड सशस्त्र दल) कॅम्प एटेपल आणि सीएएफ कॅम्प टाइमनार दरम्यान रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. त्यामुळे सुरक्षा पुरवण्यासाठी सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास तिमिनार कॅम्प येथून जवानांचा ताफा रवाना झाला होता. एटेपाल कॅम्पपासून फक्त 1 किमी अंतरावर पोहोचताच रस्त्यालगत असलेल्या टेकरीमध्ये आयईडीचा स्फोट झाला. यात 19 व्या कॉर्प्स डी कंपनी टाइमनरचे एपीसी विजय यादव (सहाय्यक प्लाटून कमांडर) हे सापडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती आहे
.