त्या' मृतदेहाची ओळखच पटेना चंद्रपूर पोलिस स्टेशन, पडोली हद्दीत ताडाळी ते छोटी पडोली रेल्वे पोल नंबर केएम ८६४ / ९ येथे एक इसम मृत अवस्थेत पडून असल्याची लेखी तक्रार फिर्यादी रोहित प्रकाश दलालने १० मार्च रोजी दाखल केली होती. परंतु, त्या मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटली नसल्याने कुणाला माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन पडोली पोलिसांनी केले आहे.

अनोळखी मृतकाचे वय अंदाजे ३० वर्षे आहे. वर्ण गोरा, उंची ५ फूट, डोक्याचे केस काळे, मिशी बारीक, चेहरा लांब, अंगात काळ्या रंगाचा फुल टी-शर्ट, कथ्या रंगाचा लोअर व उजव्या हातावर इंग्रजीमध्ये वामन असे नाव गोंदवलेले आहे.