मारहाण:लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून वधूपित्यास मारहाण


चाळीसगाव: तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रमांक ३ येथे लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून लग्नमंडपातच वधूपित्यास मारहाण केली. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. सुंदरनगर तांडा क्र. ३ येथील परशुराम आनंदा राठोड यांच्या मुलीचे लग्न गत रविवारी सुंदरनगर तांडा येथे होते. लग्नविधी अाटाेपल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवणाच्या पंगती बसत असतांृनाच गावातील संशयित देविदास हरदास राठोड, मोहनदास हरदास राठोड व शिवदास हरदास राठोड हे लग्नकार्याच्या ठिकाणी आले. आरोपींनी ‘सर्व गावाला लग्नाचे आमंत्रण दिले, आम्हाला का दिले नाही? आम्ही नातेवाईक नाहीत का?” असे म्हणत वाद घातला. गावातील काही लोकांनी लग्नात वाद नको म्हणत राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनी कुणाचेही न ऐकता वधूपित्यास मारहाण केली