पोर्ला: अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार


गडचिरोली :- अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज २८ मार्च २०२३ ला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास पोर्ला बसस्थानक नजिक परिसरात घडली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

अपघातात ठार झालेला दुचाकी स्वार देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील अजय ठाकरे वय ३२ वर्षे असून गडचिरोली वरून स्वगावी येत असतांना सदर अपघात घडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अज्ञात चारचाकी वाहन आरमोरी वरून गडचिरोली कडे येत असतांना व देसाईगंज तालुक्यातील आमगांव येथील अजय ठाकरे आपल्या दुचाकी वरून स्वगावी येत असतांना दुचाकीला धडक बसताच अजयचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून अज्ञात चारचाकी वाहनाने पोबारा केला असून सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलीस विभागास कळवताच गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार कतलाम यांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे.