स्वर्गिय नानासाहेब ए. आर. गिरासेसर यांच्या प्रथम पुण्य स्मृती दिवसा निमित्त दादासाहेब रावल जेष्ठ नागरीक संस्थेला कार्यालयीन कामासाठी ऑफीस टेबलची भेट.*



*वृत्त प्रतिनीधी-: धनंजय गाळणकर*
*दि.२१ मार्च-: दोंडाईचा येथील "दादासाहेब रावल जेष्ठ नागरीक संस्थेचे" माजी अध्यक्ष तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक स्वर्गीय नानासाहेब कै. ए. आर. गिरासेसर यांच्या प्रथम पुण्य स्मृती दिवसा निमित्त त्यांच्या रहात्या घरी रविवार दि.१९ मार्च २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात, त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमात स्वर्गिय नानासाहेब कै. ए. आर. गिरासे यांच्या स्मृती प्रित्यर्थ "दादासाहेब रावल जेष्ठ नागरीक संस्थेला" सुमारे सहा हजार रुपये किंमतीचा, सहा बाय अडीच फुट आकाराचा संस्थेच्या कार्यालयासाठी ऑफीस टेबल देणगी दाखल भेट म्हणून देण्यात आला. संस्थेच्या वतीने जेष्ठ उद्योगपती, विकासरत्न तथा दोंडाईचा संस्थानचे अधिपती श्रीमंत सरकारसाहेब रावल, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.पी. गिरासे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदरचा कार्यालयीन ऑफीस टेबलच्या भेटीचा सहर्ष स्विकार केला. सदरच्या कार्यक्रमात श्रीमंत सरकारसाहेब रावल, स्वोद्धारक शिक्षण संस्थेचे सचिव सी.एन. भाऊसाहेब यांनी स्वर्गीय नानासाहेब ए.आर. गिरासेसर यांच्या प्रती आदरांजली प्रत आठवणींना उजाळा दिला. सदरच्या कार्यक्रमात स्वर्गीय नानासाहेब कै. ए. आर. गिरासेसर यांच्या परिवारातील सदस्य आणि मित्र परिवार, प्रतिष्ठीत समाज बांधव, दादासाहेब रावल जेष्ठ नागरीक संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी स्वर्गीय ए. आर. गिरासेसर यांच्या परिवाराच्या वतीने स्मृती भोजनाचेही आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.सुरेश निबाजी चौधरी यांनी केले. तर कार्यकारणी सदस्य श्री.के. पी. गिरासे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता केली.*