दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी
धानोरा
येथे जिवंत विद्युत करंट लागुन दोन जनावरे मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 18 मार्च दुपारी अडीच वाजता च्या दरम्यान पेट्रोल पंप जवळ धानोरा येथे हा प्रकार घडला सविस्तर वृत्त असे की, आज तालुक्यात सकाळपासूनच मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली असता कालांतराने विद्युत प्रवाह खंडित झाल्याने विद्युत अर्ध्या दिवसानंतरच प्रवाह सुरळीत करण्यात आला मात्र पेट्रोल पंप धानोरा जवळील पोलावरून कै जीवनराव पाटील मुंनघाटे कनिष्ठ महाविद्यालयाकडे याच ठिकाणाहून विद्युत प्रवाह गेलेला आहे, पेट्रोल पंपा जवळील पोल वरील गार्डींग तुटल्याने एका बाजूने विद्युत तारा खाली पडले व दुसऱ्या बाजू वरील काही भाग हा वरील जिवंत तारांना लागल्याने विद्युत प्रवाह खालपर्यंत पोहोचला या परिसरात दोन जनावरे फिरत असताना त्याच ठिकाणी जिवंत तारेचा स्पर्श लागल्याने दोन्ही बैल जातीचे जनावरे मृत्यू झाले, मृत्यू झालेल्या मालकाचे लाल रंगा चे केवराम बुधजी सहारे यांचे असल्याचे कळले तर दुसऱ्याचे नाव वृत्त लीही पर्यंत कळु शकले नाही, यापूर्वीही याच परिसरात तीन चार जनावराना करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत, शहराच्या ठिकाणी असे प्रकार घडत असतील तर बाकी ग्रामीण भागात विद्युत विभागाची काय दशा असेल हे यावरून स्पष्ट होते,
बाईट
अधिक माहिती महावितरण विभागाशी संपर्क साधून सुपर फास्टचे कार्यकारी संपादक यांनी विचारणा केली असता जनावर मालकाने अर्ज देऊन शवाविच्छेदन प्रमाणपत्र सादर केल्यास आर्थिक मदत महावितरण कंपनीकडून दिल्या जाईल असे सांगितले