अन् दुकानात शिरली कपडे घ्यायला हरीण....😂


लाखनी:-
आज अकरा वाजता लाखनी येथील प्रसिद्ध व्यापारी लाईन असलेल्या सिंधी लाईन येथे व्यापारी- विक्रेते- ग्राहक आपआपल्या दुकानात व्यवहारात गर्क असताना स्थानिक गुरुनानक कापड दुकानात कळपातुन चुकून भरकटलेल्या चितळ प्रजातीच्या हरणाने सर्वाना काही कळायच्या आत दुकानात प्रवेश केला व नागरीक- व्यापारी यांचा एकच गदारोळ सिंधी लाइन येथे माजला.दुकानमालक संजय गुरूनानी यांनी समयसूचकता दाखवित पटकन शटर पाडून आत बंदिस्त केले व वनविभाग लाखनी कार्यालय येथे सूचना दिली.वनविभाग लाखनीचे


व्हिडियो इथे क्लिक करून जरूर बघा
👇👇👇👇👇👇👇


वनपरिक्षेत्राधिकारी सुरज गोखले यांचे मार्गदर्शनात लाखनी क्षेत्र वनपाल जितेंद्र बघेले, लाखनी बिटरक्षक कृष्णा सानप व चांदोरी बिटरक्षक नितीन उशीर हे तात्काळ ग्रीनफ्रेंड्सच्या निसर्गमित्रांसोबत हजर झाले . ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे वन्यप्राणी रेस्क्यू क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले पंकज भिवगडे,विवेक बावनकुळे,मनीष बावनकुळे यांनी याठिकाणी वनविभाग व नागरिक यांचे सहकार्याने हरिणीची सुरक्षित सुटका करण्यासाठी सरसावले. सोबतच गर्दीला नियंत्रित करण्यासाठी लाखनी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तांबे हे सुद्धा स्टाफसोबत हजर झाले.या सर्वांच्या


एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नामुळे चितळाला सुरक्षितपणे सुटका करून लगेच गडेगाव डेपो येथे नेण्यात येऊन पंचनामा आटोपल्यावर चितळाचा अधिवास असलेल्या क्षेत्रात सोडण्यात आले.ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी या घटनेविषयी अधिक माहिती देतांना सांगितले की लाखनी परिसरातील सभोवताली शेतात या चितळाचा अधिवास असून कळप शेतात असताना चुकून कळपाशी संपर्क तुटल्याने भरकटुन ते या परिसरात आले असावे किंवा पाण्याच्या शोधात ते कळपाशी चुकून भरटकले असावे असा अंदाज टीसनी व्यक्त केला.ह्यांना सर्वजण 'हरीण' म्हणत असले तरी हरीण ही 'प्रजात' किंवा 'प्रकार' असून ठिपके असल्याने ह्यांना 'चितळ' प्राणी इंग्रजीत 'स्पॉटेड डिअर' असे म्हणतात अशीही माहिती त्यांनी पुरविली.तत्पुर्वी वनविभागाने सर्वांसमक्ष पंचनामा करून एन.जी.ओच्या सह्या घेतल्या व त्यांच्या सहकार्याने सुरक्षित सुटका केली.याकार्यात रोहित निर्वाण,रितेश कांबळे,महेश गुरूनानी,अतुलभिवगडे, नगरसेवक सचिन भैसारे,नाना आंबिलकर, सिंधी समाज संस्था व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल टहल्यानी यांचे सोबत अनेक दुकानदार व नागरीकांनी सुद्धा सहकार्य केले.
यावेळी लाखनी शहरात लग्न सराईचा मोसम असल्याने "कापड खरेदीला सुद्धा आले हरिण" अशीच मजेदार चर्चा सर्वत्र चालू होती.