एका ४२ वर्षीय महिलेचे ४० वर्षीय पुरुषाशी अनैतिक संबंध अन् झाला खून


नागपूर : दिघोरीतील एका ४२ वर्षीय महिलेचे ४० वर्षीय पुरुषाशी अनैतिक संबंध होते. त्याला तिचे आणखी कुणाशीतरी अफेअर असल्याचा संशय होता. तू माझ्याशी फिरायला येते आणि दुसऱ्याशी असलेले संबंध त्याला पसंत नव्हते. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. २३ मार्चला तो तिला घेऊन हिंगणा हद्दीतील जंगलात घेऊन गेला. तिथ त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला दगडाने ठेचले. इकडे ती घरी आली नव्हती. त्यामुळे घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.

बेपत्ता महिलाचा मृतदेह सापडला
नागपुरात प्रियकराने जंगलात नेऊन केली महिलेची हत्या केली. वाठोडा परिसरातून 45 वर्षीय श्वेता (नाव बदललेलं) महिला मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तीन दिवसानंतर बेपत्ता महिलेचा मृतदेह हिंगणा हद्दीत बनवाडी शिवार येथे आढळला. आरोपीला वाठोडा पोलिसांनी अटक केली