ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेने शासक वर्ग ब्राम्हणांत घबराट

ईव्हीएमविरोधी जनआंदोलन निर्माण होणार
पुणे: ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा पार्ट-२ कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काढण्यात येत आहे. या परिवर्तन यात्रेचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम करत आहेत. 

या ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेमुळे शासक वर्ग ब्राम्हणांमध्ये घबराट पसरली आहे. ईव्हीएमविरोधी जनआंदोलन उभे राहिले तर ईव्हीएम हटवावे लागेल. ईव्हीएम हटले तर देशातील आपली सत्ता समाप्त होईल याची भीती शासक वर्ग ब्राम्हणाला आहे. कारण बहुजन समाज आता जागृत झाला आहे. या यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली या अगोदर पहिली ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आली होती. आताची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. त्याचबरोबर या परिवर्तन यात्रेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश लोकांपर्यंत पोहचवला जात आहे. 

‘शासनकर्ती जमात बना’ असा संदेश डॉ. आंबेडकरांनी दिला होता. परंतु बहुजन लोक विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणांनाच शासनकर्ती जमात बनवत आहे. त्यामुळे सारा सत्यानाश झाला आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार हा ब्राम्हणाला शासक वर्ग बनवण्यासाठी नसून बहुजनांनी शासक वर्ग बनण्यासाठी आहे. याची माहिती बहुजनांना नाही, त्यामुळेच त्यांच्यात जागृती व्हावी म्हणून हा संदेश दिला जात आहे.

२००४-०९ आणि २००९-१४ व २०१४-१९ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे कॉंग्रेस व भाजपाने कसा ईव्हीएम घोटाळा केला आणि केंद्राची सत्ता हस्तगत केली याची पोलखोल केली जात आहे. त्याचबरोबर डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांची ईव्हीएमबाबत भूमिका व वामन मेश्राम यांनी निवडणूक आयोगाविरोधात दाखल केलेला खटला याबाबत लोकांना माहिती दिली जात आहे. त्यातच निवडणूक आयोग ईव्हीएम घोटाळ्यात कशाप्रकारे सहभागी आहे याचे दाखले दिले जात आहेत. 

ईव्हीएम चोर असून निवडणूक आयोग चोरांचे सरदार आहे अशाप्रकारे वामन मेश्राम यांनी अनेकदा टीका केली आहे. तरीही निवडणूक आयोगाने चुप्पी साधली आहे. यावरून निवडणूक आयोग संशयाच्या भोवर्‍यात आहे. दि. ८ ऑक्टोबर, २०१३ मध्ये ईव्हीएमविरोधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकांना माहित पाहिजे होता, मात्र स्वत:ला राष्ट्रीय मीडिया म्हणवणार्‍या मीडियाने याची बातमीच छापली नाही. त्यामुळे लोकांना काहीच माहित समजली नाही. त्याबाबतही लोकांना सांगण्यात येत आहे. 

ईव्हीएम घोटाळा व्हावा म्हणून निवडणूक आयोगाने ५६ (सी), ५६ (डी) आणि ४९ एमए अशाप्रकारे नवीन नियम बनवले. म्हणजेच घोटाळा व्हावा अशी निवडणूक आयोगाची भूमिका आहे. या राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रेत निवडणूक आयोगाची पोलखोल होणारच आहे. 

त्याचबरोबर ब्राम्हणी पक्ष कॉंग्रेस-भाजपा कशाप्रकारे घोटाळा करतात याची जंत्रीच मांडली जात आहे. त्यामुळे शासक वर्गात घबराट निर्माण झाली आहे. ईव्हीएमविरोधी जनआंंदोलन निर्माण होण्याची शक्यता बळावली असल्याने काय करावे असा प्रश्‍न शासक वर्गासमोर निर्माण झाला आहे.