देसाईगंज २० । जुनी पेन्शन हा कर्मचार्यांचा संवैधानिक अधिकार असुन शासनाने तो अधिकार कर्मचार्यांना बहाल करावा यासाठी महाराष्टातिल शासकिय व निमशासकिय कर्मचार्यांनी १४ मार्च पासुन संप पुकारला असुन त्याचे पडसाद उमटले आहे गेल्या ७ दिवसांपासुन देसाईगंज तालुक्यातिल कर्मचार्यांनी या संपात सहभाग घेतला असुन जैनुद्दीन जव्हेरी महालयापासुन ते तहसिल कार्यालयावर मोर्चेकरी कर्मचार्यांनी आज मोटारसायकिल मार्च काढुन धडक दिली महाराष्ट्रातिल सर्वच विभागाच्या कर्मचार्यांनी १९८४ च्या शासन निर्णयानुसार पेंन्शन मिळायला पाहिजे यासाठी १४ मार्च पासुन आंदोलन सुरु केले आहे याचे पडसाद देसाईगंज तालुक्यातही उमटले असुन कर्मचार्यांचे संप सुरुच असल्याने शासकिय कामकाजावर याचा मोठा परिणाम पहावयास मिळत आहे जुनी पेंन्शन हा कर्मचार्यांचा संवैधानिक अधिकार असुन २००५ पासुन शासनाने पेन्शन योजना बंद केल्याने कर्मचार्यांचे नौकरोत्तर चे जिवनमान धोक्यात आले आहे ही गंभीर बाब लक्षात घेवुन शासनाने जुनी पेंन्शन पुर्ववत बहाल करावी अशी मागणी या मोर्चाचे अध्यक्ष शिक्षक संघटनेचे धनपाल मिसार यांनी केली या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षन संस्था देसाईगंज चे विष्णु नागमोती रामदास मसराम अनिल मुलकलवार वैद्यकिय कर्मचारी संघटनेचे पवार ग्राम विकास अधिकारी संघटनेचे विविध कर्मचारी प्राथमिक शिक्षण संघटनेचे बावणे महसुल यंञणेच्या अर्चना वडेट्टीवार जैनुद्दीन जव्हेरी महाविद्यालयाचे प्रा डॉ शेख तालुका कृषी विभागाच्या कल्पना ठाकरे दुर्गा कोडापे यांचेसह देसाईगंज तालुक्यातिल सर्वच प्रशासकिय यंञणेचे शेकडो कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले मोर्चेकर्यांना संबोधीत करतांना धनपाल मिसार म्हणाले की शासन जुनी पेंन्शन योजना बंद करुन कर्मचार्यांच्या कुटुंबियांचा अंत पाहत आहे ही बाब अतिशय घातक असुन याचे परिणाम अतिशय वाईट होतिल ३० ते ३५ वर्षे शासकिय सेवा देणार्या कर्मचार्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पेंन्शन देण्याची तरतुद संविधानात केली असुन पेंन्शन बंद करुन नौकर्यांचे खाजगिकरण करण्याचा कुटिल डाव राज्यकर्ते करत आहेत सुशिक्षित बेरोजगारांच्या मनामध्ये नौकरदार वर्गाविषयी विष तयार करुण गरड ओकण्याचे काम सातत्याने सुरु असुन काही आमदार बेछुट व बेजबाबदार वक्तव्य करतांना दिसत आहेत एवढेच नव्हे तर संपकर्या कर्मचार्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्नही शासनकर्ते करतांना दिसत आहेत
कर्मचारी जिवाचे रान करुन कर्तव्य बजावतात शासनाची व शासकिय यंञनेची संपुर्ण भिस्त कर्मचार्यांवर असते योजना जनतेपर्यंत पोहचवुन त्या माध्यमातुन दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मचारी मोलाची भुमिका बजावतात असे असतांना संविधानाने बहाल केलेले पेंन्शनचे अधिकार हिरावुन घेणे म्हनजे एकप्रकारे कायद्याची पायमल्लीच करणे होय असा घणाघातही धनपाल मिसार यांनी या प्रसंगी केला जुनी पेंन्शन बहाल केल्या शिवाय संप मागे घेणार नाही यापुढे तिव्र आंदोलन उभारु असा इशारा निवेदन सादर करतांना कर्मचार्यांनी दिला या प्रसंगी शिक्षक ग्रामसेवक महसुल कर्मचारी आरोग्यकर्मचारी वनविभागाचे कर्मचारी प्राथमिक शिक्षक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी तथा देसाईगंज उपविभागातिल सर्वच यंञणेचे शेकडो कर्मचारी या मोर्चात उपस्थित होते ।.