सिंदेवाही:- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामाच्या संदर्भात माहिती विचारणाऱ्या एका दैनिकाच्या पत्रकारास ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली असल्याने तालुक्यातील पत्रकार संघटनेने हिसका दाखवताच अखेर ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी सर्व पत्रकार बांधवांची जाहीर माफी मागितली आहे.
पोलिसांनी लगेच संबंधित ग्रामसेवक यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलाविले. आणि झालेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता माझी प्रकृती बरी नसून माझी बी. पी. वाढलेली होती. त्यामुळे माझ्या कडून अनवधनाने पत्रकार बंधूंना शिवीगाळ केली. माझे आणि सुनील गेडाम यांचे संबंध अतिशय चांगले असून यापूर्वी मी कधीच सुनील भाऊ, किंवा तालुक्यातील इतर पत्रकार बंधूंना अपशब्द वापरले नाहीत. असे ग्रामसेवक श्रीकांत नन्नेवार यांनी पोलिसांसमोर सांगितले तसेच झालेल्या प्रकाराबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंची जाहीर माफी मागत असून तसा माफीनामा सुद्धा लिहून दिला आहे. पोलिसांनी सुद्धा यावेळी ग्रामसेवक श्रीकांत नन्नेवार यांना चांगलीच समज दिली.
यावेळी पत्रकार म्हणून अमृत दंडवते, बाळू बतकमवार, महेंद्र कोवले, संदीप बांगडे, सुनील गेडाम, खालिद पठाण, मिथुन मेश्राम, आक्रोश खोब्रागडे, अमन पटेल, वीरेंद्र मेश्राम, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू लोणारे, सचिव योगेश बारेकर, ग्रामसेवक अशोक शिंदे, वाकडे, अतुल मेश्राम, इत्यादी उपस्थित होते...